मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील गट काश्‍मीर दौऱ्यावर जाणार

श्रीनगर-माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा गट पुढील महिन्यात जम्मू-काश्‍मीरच्या दौऱ्यावर जाणार आहे. कॉंग्रेसच्या या गटात गुलाम नबी आझाद आणि अंबिका सोनी या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असेल. हा गट त्या राज्यातील कॉंग्रेस नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करेल.

जम्मू-काश्‍मीरमधील सद्यस्थिती जाणून घेणे या या गटाच्या दौऱ्याचा उद्देश असेल. त्या राज्यात पीडीपी-भाजप युतीचे सरकार आहे. सत्तेवर नसणाऱ्या समविचारी गटांशीही कॉंग्रेसचा गट चर्चा करणार आहे. जम्मू-काश्‍मीरच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवेळी एप्रिलमध्ये हिंसाचार उफाळून लावला. त्यानंतर निदर्शनांमुळे काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती बिघडली. त्या घडामोडीपाठोपाठ कॉंग्रेसने मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्‍मीरशी संबंधित धोरण आखण्यासाठी गटाची स्थापना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)