मनमोहनसिंग हे यशस्वी पंतप्रधान : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेस व त्यांच्या नेत्यांवर विविध विषयांवरून आक्रमक टीका केली जात असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मात्र माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची आज जोरदार पाठराखण केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मनमोहनसिंग हे कधीच ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनीस्टर नव्हते तर ते भारतातले एक यशस्वी पंतप्रधान होते.

ते म्हणाले की ज्या व्यक्तीने देशाचे दहा वर्ष पंतप्रधानपद भुषवले आहे आणि जे आपल्या कर्तृत्वाने लोकांच्या आदराला पात्र ठरले आहेत ते ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनीस्टर असू शकत नाहीत. त्यांना तसे संबोधणेही चुकीचे आहे. नरसिंहराव यांच्या नंतर देशाला जर कोणी यशस्वी पंतप्रधान मिळाला असेल तर ते केवळ एकटे मनमोहनसिंग हेच आहेत असेही राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनमोहनसिंग यांच्यावर काढण्यात आलेल्या ऍक्‍सिडेंटल प्राईममिनीस्टर या चित्रपटामुळे भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात जोरदार वादंग माजले आहे. हा सिनेमा येत्या 11 तारखेला प्रकाशित होणार आहे. कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांनी राऊत यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी वरील प्रतिक्रीया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)