मनपा महासभेबाबत अनिश्‍चितता कायम

गटनेते पदाचा वाद- मनपाला म्हणणे मांडण्यासाठी एक दिवसाची मुदत

नगर – स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या तसेच महिला बालकल्याण समितीच्या 16 सदस्य नेमणुकिसाठी बोलविण्यात आलेल्या मनपा महासभेवर अनिश्‍चिततेचे सावट पुन्हा गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गटनेते पदासंदर्भात नगरसेवक संपत बारस्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर आज दि.19 रोजी सुनावणी होणार होती. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे नगर सेवक अरिफ शेख यांनी संपत बारस्कर यांच्या याचिकेत प्रतिज्ञापत्र सादर केल्याने महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी न्यायालयाने मनपाला एक दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे दि.21 रोजी होणाऱ्या महासभेबाबत अनिश्‍चितता आज कायम राहिली आहे.
मनपात गटनेते पदावरोन गेल्या काहि महिन्यात चांगलेच वादंग रंगले असूनमनपा प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातच याबाबत एकमत नसल्याने हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. यापुर्वी मनपा सभागृहात कॉंग्रेसचे गटनेता संदिप कोतकर, राष्ट्रवादीचे समदखान , मनसेचे गणेश भोसले,भाजपाचे दत्ता कावरेआणि शिवसेनेचे संजय शेंडगे हे गटनेते होते तर नव्या यादी प्रमाणे कॉंग्रेसच्या सुवर्णा कोतकर ,राष्ट्रवादीचे संपत बारस्कर ,मनसेच्या वीणा बोज्जा, भाजपाचे सुवेंद्र गांधी हे गटनेते पदी असल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. याच यादीवरून मनपाच्या अंदाजपत्रकिय महासभेच्या वेळी वाद होवून राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या काहि नगर सेवकांनी सभात्याग केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या पुर्वी आ.संग्राम जगताप यांची एक याचिकाही न्यायालयात असून हे प्रकरण प्रलंबित आहे.
स्थायी सतीतीचे आठ सदस्य तसेच महिला बालकल्याण समितीचे 16 सदस्य निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या महासभेची माहिती जुन्याच गटनेत्यांना देण्यात येवून त्यांच्याकडुन स्थायीसमितीच्या सदस्यांची नावे मागविण्यात आल्याने या महासभेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. याप्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होती मात्र याच बाबत एक प्रतिज्ञापत्र दाखल झाल्याने मनपाने काय कार्यवाही केली याची माहिती न्यायालयाने मनपाकडे मागितली,ती सादर करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिलीआहे. आता या प्रकरणी मंगळवारी ( दि.20 )रोजी सुनावणी होणार असून त्यानंतरच या अनिश्‍चिततेबाबत चे चित्र स्पष्त होईल. संपत बारस्कर ,अरिफ शेख यांच्या वतीने ऍड प्रसन्न जोशीयांनी तर महापौरांच्या वतीने ऍड व्ही एस दिघे यांनी बाजु मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)