मनपा पतसंस्थेचा लौकिक अधिक वाढवावा

महापौर वाकळे यांची अपेक्षा; नूतन महापौर, उपमहापौरांचा पतसंस्थेतर्फे सत्कार

नगर: महापालिका कर्मचारी पतसंस्था ही कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने कामधेनु असून तिचा लौकिक वाढविण्याची, ती टिकविण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच सर्व सभासदांचीही आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे अशी अपेक्षा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या महापौर पदी बाबासाहेब वाकळे व उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड झाल्याबद्दल महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर देशपांडे, उपाध्यक्ष बाळासाहेब गंगेकर, संचालक जितेंद्र सारसर, दिलीप कोतकर, बाबासाहेब मुदगल, विलास सोनटक्के, सतीश ताठे, विकास गीते, किशोर कानडे, कैलास भोसले, बाळासाहेब पवार, प्रकाश आजबे, अजय कांबळे, संचालिका नंदा भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

महापौर वाकळे म्हणाले, या पतसंस्थेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होत आहे. कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणासाठी, आजारपणासाठी, तसेच विविध प्रकारच्या अडचणींच्या काळात कर्ज रूपाने विनाविलंब पैसे उपलब्ध होत असल्याने कर्मचारी वर्ग सुखाने जीवन जगत आहे. अशा या कामधेनुचा कारभार चांगल्या प्रकारे सुरु आहे. इतर संस्थांसारखे प्रकार इथे घडत नाहीत. त्यामुळेच या पतसंस्थेचा लौकिक टिकून आहे. तो यापुढेही तसाच राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. महापालिकेमार्फत पतसंस्थेसाठी कायमच सहकार्य राहील. असेही शेवटी महापौर वाकळे म्हणाले.

पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर देशपांडे म्हणाले की, पतसंस्थेमार्फत सभासदांना कर्जवितरण करून त्यांची आर्थिक गरज भागविण्याबरोबरच वर्षभर सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी कर्जाची सोय, तसेच एखादा सभासद दुर्दैवाने मयत झाल्यास त्याचे 50 हजारांचे कर्ज माफ करण्याचा निर्णयही मागील महिन्यातच घेण्यात आला आहे. इतर संस्थांसारखे या संस्थेत राजकारण नाही,त्यामुळे सर्वच पदाधिकारी सर्व निर्णय एकमताने घेत असतात. संस्थेमार्फत यापुढील काळातही अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)