मनपा क्षेत्रातील बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

क्रेडाई पुणे मेट्रो, पुणे महापालिका आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानतर्फे आयोजन
पुणे, दि.17- बांधकाम साईटवर काम करणा-या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगारांसाठी मोफत 45 आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रेडाई पुणे मेट्रो, पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे. याचे पहिले शिबीर नुकतेच औंध येथे पार पडले.
नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा. लि.चे संचालक आनंद नाईकनवरे, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. दिवाकर अभ्यंकर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या सदस्या आणि क्रेडाई पुणे मेट्रो महिला शाखेच्या निमंत्रक अर्चना बडेरा, सपना राठी, कामगार कल्याण समितीचे सदस्य पराग पाटील, समन्वयक समीर पारखी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी व राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाच्या सहसचिव डॉ. केतकी घाटगे, लसीकरण अधिकारी डॉ. अमित शाह, महापालिकेचे समन्वयक अधिकारी विनोद जाधव आदी योवळी उपस्थित होते.
या पहिल्या आरोग्य तपासणी शिबिरात 180 बांधकाम कामगारांची तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीबरोबरच कामगारांना धनुर्वाताचे इंजेक्‍शन आणि बालकांना पोलिओ लस देण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पुढील आरोग्य शिबिरे येत्या सहा महिन्यात पालिकेच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत कामगारांची आरोग्य तपासणी, त्यांच्या मुलांना लसीकरण, राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण, बालकांची जन्म नोंदणी आदीचा समावेश असणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना कल्पना बळीवंत म्हणाल्या, कामगारांना विविध बांधकामांच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या लसीकरणाचा डोस पूर्ण होत नाही, परिणामी भविष्यात त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी ही शिबिरे उपयुक्त ठरतील.पहिल्या शिबिरामध्ये स्त्रीरोगतज्ञ, फिजिशियन, डॉक्‍टर्स, परिचारिका अशा एकूण 15 लोकांच्या चमुने सहभाग घेतला. सोबत लसीकरण वाहनाचीही सोय केली होती. पावसाळ्यात बळावणा-या रोगराईची शक्‍यता लक्षात घेतल्यास आरोग्याबाबत कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा योग्य काळ आहे, अशी माहिती डॉ. केतकी घाटगे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)