मनपा कारभारासाठी पूर्णवेळ आयुक्त मिळावा- बाबासाहेब वाकळे

 महापौर-उपमहापौरांनी स्वीकारला पदभार

नगर: महानगरपालिकेच्या कारभारात सुसूत्रता येण्यासाठी पूर्णवेळ आय ए एस दर्जाचा आयुक्त मिळावा किंवा सध्याच्या आयुक्तांनी महापालिकेला पूर्णवेळ द्यावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगत मंत्री गिरीश महाजन महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी उपस्थित होते ,त्यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी याच महिन्यात 100 कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्या साठी प्रस्ताव व विकासकामांचे नियोजन तातडीने अधिकाऱ्यांमार्फत करणार आहोत. अशी माहिती नुतन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पदभार स्विकारतांना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नूतन महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत नवीन वर्षाच्या मुहूर्तावर वेदोमंत्रोच्चारात पदभार स्विकारला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा आदिंसह भारतीय जनता पार्टीचे, बसपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना नूतन महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात व राज्यात जो विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांचा आदर्श घेऊनच नगरमध्येही आम्ही कामे करणार आहोत. पंतप्रधान आज 20-22 तास काम करत आहेत. मीही नगरसाठी 12 तासाहून अधिक वेळ देणार आहे. महापालिकेत महापौर व उपमहापौरपदाचा पदभार स्विकारल्यानंतर लगेचच अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेत आहोत. रखडलेली कामे ताबडतोब मार्गी लावत आहोत.

महापालिकेत बरीचशी महत्वाची पदे रिक्त आहेत. मुख्य म्हणजे शहर अभियंता व त्याखालोखाल अभियंत्यांची पदेरिक्त आहेत, ती प्राधान्याने भरण्यासाठी चांगले अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी करणार आहोत. महापालिकेत अधिकारी व पदाधिकारीही दोन प्रमुख चाके आहेत. ही दोन्ही चाके बरोबर चालली तर महापालिकेचा कारभार वेगाने पुढे जाईल. त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक, बहुजन पार्टीचे नगरसेवक, अपक्ष व जे कोणी आम्हाला कामांकरीता पाठिंबा देतील त्यांना बरोबर घेऊन महापालिकेचा कारभार उत्कृष्ट करण्याचा मानस आहे. नागरिकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करुन त्यांना भावेल असेच काम अडीच वर्षात करणार आहोत.

उपमहापौर मालन ढोणे म्हणाल्या, केंद्रात भाजपाचे सरकार, राज्यात भाजपाचे सरकार आता नगरमध्येही भाजपाची सत्ता महापालिकेत आहे. त्यामुळे नगर शहराचा विकास हाच विषय घेऊन आम्ही आज पदभार स्विकारला आहे. याआधी कधीही भाजपाचा महापौर झाला नाही. भाजपाला उपमहापौरपद तीन वेळेला मिळाल मात्र प्रत्येक वेळी सापतकीक वागणूक मिळाली. सर्वपक्षांच्या मदतीने आम्हाला हे पदमिळाले आहे, त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे. यासाठी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, भानुदास बेरड यांचे मार्गदर्शन घेणार आहोत.

शेवटी आभार मानतांना बहुजन समाज पक्षाचे नेते सचिन जाधव म्हणाले, भारतीय जनता पार्टीला बसपाने बिनशर्त पाठिंबा देऊन सत्तेत सहभाग घेतला आहे. सर्वकामांना आमचे सहकार्य राहील. यावेळी भाजपाच्या नगरसेविका आशा कराळे, भैय्या गंधे, वंदना ताठे, रविंद्र बारस्कर, सोनाली चितळे, राहुल कांबळे, गौरी नन्नवरे, दत्ता शेळके, मनोज कोतकर, बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख, अक्षय उनवणे, अनिता पंजाबी, अश्‍विनी जाधव आदिंसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आर्थिक उत्पन्न देणारे प्रकल्प सुरू करणार

मंत्री गिरिश महाजन हे महापौर निवडणुकीच्यावेळी नगरमध्ये उपस्थित होते. आमची महापौर-उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर त्यांनी शहराच्या विकासासाठी ताबडतोब याच महिन्यात 100 कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्या साठी प्रस्ताव व विकासकामांचे नियोजन तातडीने अधिकाऱ्यांमार्फत करणार आहोत. सर्वांना बरोबर घेऊन विकास करण्याच्या अजेंड्याने आम्ही आज महापौर-उपमहापौरपदाचा पदभार घेतला आहे. महापालिकेला आर्थिक उत्पन्न सुरु व्हावे असे प्रकल्प हाती घेणार आहोत तसेच खर्चामध्ये बचत व्हावी यासाठी प्रलंबित सौरउर्जा प्रकल्प पूर्ण करणार आहोत. प्राधान्याने फेज-2 योजना 100 टक्के कार्यान्वित करुन नागरिकांना रात्री- अपरात्री पाणी भरण्यासाठी उठावे लागणार नाही; याची काळजी आम्ही घेऊ. नगरमध्ये पर्यटन वाढून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठीही भर देणार आहोत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)