अहमदनगर: मनपाच्या वसुली पथकाची मोठी कारवाई

12 लाख 63 हजार पाचशे 21 रुपये धनादेशाद्वारे मनपाकडे जमा
पाच ठिकाणी कारवाई, 11 ठिकाणी धनादेश प्राप्त, कारवाई टळली
प्रभाग 19 चे भाजीबाजार गाळेधारक 2 जुलैला बाकी भरणार
कारवाई चालूच राहणार

नगर – महानगरपालिकेच्या तीन प्रभाग समिती वसुली पथकाने आज (दि. 29) मोठी मोहीम राबविली. एक, तीन व चार क्रमांकाच्या प्रभाग समिती पथकांनी कार्यक्षेत्रात कारवाई केली. यात प्रत्यक्षात पाच ठिकाणी कारवाई झाली. 11 ठिकाणी धनादेश दिल्याने कारवाई टळली. एका ठिकाणी पूर्वी जप्त केलेल्या गाळ्याची थकबाकी संबंधिताने भरली. प्रभाग क्रमांक 19 च्या भाजीबाजारातील गाळेधारकांनी 2 जुलै रोजी बाकी भरण्याचे आश्‍वासन दिल्याने कारवाई स्थगित केली. तर, आजच्या कारवाईत 12 लाख 63 हजार पाचशे 21 रुपये धनादेशाद्वारे मनपाकडे जमा झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभाग समिती क्रमांक चारची कारवाई
बुरुडगाव भाजीपाला बाजाराच्या पहिल्या मजल्यावरील मे. वॉटर ऍण्ड एजन्सी, संगम ट्रान्सपोर्ट यांच्या कार्यालयाची थकबाकी 4 लाख दोन हजार 569 आहे. त्यांची मालमत्ता आज सील केली. केडगावमध्ये राजमहंमद पटेल (थकबाकी – एक लाख 58 हजार 141 रू.), सूर्यभान रणदिवे ( 63 हजार 68) यांचे नळजोड बंद केले. तर, पुष्पा गोसावी (90 हजार 55), राजू घोडके (40 हजार), वैजिनाथ सातपुते (50 हजार), जनाबाई गायकवाड (15 हजार), चंद्रकांत म्हेत्रे (एक लाख) या सर्वांनी धनादेश वसुली पथकाच्या स्वाधीन केल्याने कारवाई रद्द करण्यात आली. या प्रभागातील कारवाईत प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, केडगाव विभागप्रमुख दिलीप कोतकर, भरत काकडे, सुनील सातपुते, सुदाम कासार, बबन कारंडे, संजय लोंढे, गणेश जाधव, नरेंद्र लगड, गोरख गायकवाड, राजू कांबळे सहभागी होते.

प्रभाग समिती एकची कारवाई
सावेडीतील श्रीकृष्ण नवले, भोगवटादार कांचन कांबळे (36 हजार नऊशे 62) यांचा फ्लॅट सील केला. गीता अपार्टमेंटमधील गुरुनानी बिल्डर्सचा (36 हजार 990) गाळा क्रमांक 7 सील केला.

आदिशक्ती अपार्टमेंटमधील सुनील दातरंगे (27 हजार आठशे 49), श्रमिकनगरमधील बालमणी अशोक बिज्जा (91 हजार आठशे 12), रजनीगंधा अपार्टमेंटमधील रवींद्र खर्डे व इतर तीन यांचे अनुक्रमे गाळा क्रमांक पी 1 – (28 हजार 142), पी 2 – (28 हजार 233), पी 3 – (22 हजार दोनशे 17) तसेच नंदकुमार पतंगे (67 हजार एकशे एक) या सर्वांनी संपूर्ण रकमांचे धनादेश दिल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. तर, पायल अपार्टमेंटमधील रामा लोखंडे (दोन लाख 69 हजार 126) यांचा गाळा 26 जून रोजी सील केला होता. त्यांनी आज पूर्ण रक्कम अदा केली. या कारवाईत प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, करनिरीक्षक संजय उमाप, बबन काळे, रफीक देशमुख, अनिल पवार, राजेश आनंद आदी सहभागी होते.

प्रभाग समिती तीनची कारवाई

झेंडीगेट भागात वसुली पथक जप्तीपूर्व नोटीस बजावण्यासाठी गेले होते. परंतु, संबंधित मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील चार लाख 33 हजार नऊशे 86, 56 हजार तीनशे व 66 हजार एकशे 71 रुपयांचे धनादेश दिले. त्यामुळे येथील जप्तीची कारवाई टळली आहे. या पथकात प्रभाग अधिकारी अशोक साबळे, करनिरीक्षक सुनील साठे, एजाज शेख, संजय दगडे, सय्यद अकील, कबीर शेख, असलम शेख, शिवाजी महांकाळ, भगवान झिंजुर्डे यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)