मनपाच्या आरोग्य विभागाकडून सात किलो नायलॉन मांजा जप्त

-पतंग विक्रेत्यांवर भरारी पथकाची नजर : प्रशासनाकडून प्रबोधन आणि दंडात्मक कारवाई
-पतंग विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाने बजावल्या नोटिसा

नगर – जीवघेणा नायलॉन मांजा विक्रीला शहरात बंदी असताना देखील त्याची विक्री होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत बंदी असलेला मांजा विक्रीचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेने सात ते आठ किलो नायलॉन मांजा जप्त केला आहे. या मांजा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान, या विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी पक्षीप्रेमी आणि सामाजिक संघटना करू लागल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर कारवाईसाठी महापालिकेची पथके कार्यरत झाली आहेत. बुधवारी (ता. 9) काही विक्रेत्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे. सुमारे 7 ते 8 किलो माल जप्त करण्यात आला आहे. विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील दुकानांची तपासणी करून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच नागरिक व युवकांचे नायलॉन मांजा न वापरण्याबाबत प्रबोधन करून आवाहन केला जात असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांनी दिली आहे.

नायलॉन मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यात नागरिकांचा जीवही गेला आहे. नायलॉन मांजा लवकर नष्ट होत नसल्याने पक्षांना त्याचा अतिरेक त्रास होत आहे. त्यामुळे नायलॉन मांजाच्या वापरासह विक्रीवर स्थानिक प्राधिकरणाने म्हणजेच महापालिकेने काही वर्षापूर्वी निर्बंध घातले आहेत. मकरसंक्रांतीचा सण जवळ आला असून, शहरात अनेक ठिकाणी पतंग व मांजा विक्रीची दुकाने सजली आहेत. बंदी असतांनाही नायलॉन मांजाची छुप्यापध्दतीने विक्री सुरू असल्याने मनपाच्या पथकाकडून शहरात तपासणी सुरू आहे. बुधवारी शंभराहून अधिक विक्रेत्यांना मनपाने नोटीसा बजावून दुकानांची तपासणी केली आहे.

भिंगारमध्ये नायलॉन मांजाची सर्रास विक्री

नगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले भिंगार शहरात जिल्ह्यात सर्वात अगोदर नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली. कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य बाळासाहेब पतके, नितीन शिंगवी, अशोक जाधव यांच्यासह सामाजिक संघटनांनी लढा उभारला होता. त्याची दखल घेत कॅंटोन्मेंट बोर्डाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यानच्या काळात अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन गेले. तशी या बंदीचा निर्णयाचा विसर अधिकाऱ्यांना पडला आहे. त्याचाच फायदा घेत काही विक्रेत्यांनी नायलॉन मांजा विक्रीसाठी डोके वर काढले आहे. या नायलॉन मांजावर विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)