मनपाची सत्ता कोणाकडे, आजच्या अर्जांनी स्पष्ट होणार

शिवसेनेकडून बोराटे निश्‍चित भाजप आणि राष्ट्रवादीची आज निर्णायक भूमिका

नगर: महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे समीकरणे आज स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज नेण्याचा आज (ता. 27) शेवटचा दिवस आहे. शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांनी महापौरपदासाठीचा अर्ज नेला आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांनी या दोन्ही पदासाठी एकही अर्ज नेलेले नाही. दरम्यान, बहुजन समाज पक्षाने आज त्यांच्या चार नगरसेवकांना पक्षाध्यादेश बजावून मतदान करण्याचे सूचविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेची सत्ता कोणाकडे, हे चित्र नगरकरांसाठी महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक जाहीर झाल्यापासून अस्पष्टच होते. राजकीय विश्‍लेषणांनी सत्तेची अनेक समीकरणे मांडली आहेत. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असून देखील भाजप हा किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला सत्ता स्थापनेचे आंमत्रण देत महापौरपद देऊ केले आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांना देखील शिवसेना नकोशी आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर नजर फिरवण्यास सुरूवात केली आहे. यावरून राजकीय समीकरणे वेगाने फिरू लागली आहेत. भाजपकडून बाबासाहेब वाकळे हे महापौरपदासाठी इच्छुक आहेत.

“पक्ष जी भूमिका देतील, ती पार पाडू,’ असे वाकळे सांगत आहेत. वाकळे काहीही चमत्कार करू शकतात, याचा अनुभव शिवसेनेला स्थायी समितीच्या निवडणुकीत आलेला आहे. त्यामुळे वाकळे यांना रोखण्यासाठीच तिसरे अपत्याचे अस्त्र शिवसेनेने अर्जुनराव बोरुडे यांच्या माध्यमातून उपसल्याचे सांगितले जात आहेत. शिवसेनेच्या या खेळीमुळे वाकळे चांगलेच दुखावले गेले आहेत. ते उट्टे काढण्यासाठी वाकळे यांनी महापौरपदासाठी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. भाजपला सत्ता आणि महापौरपदाचे स्वप्न पूर्ण होताना दिसू लागल्याने समीकरणे युतीऐवजी वेगळ्या मार्गाने आखण्यास सुरूवात केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसनेने देखील शिवसेनेला सत्तेपासून कोणत्याही परिस्थिती रोखण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी भाजपला सर्वोत्तोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या या खेळीत त्यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा सहभाग असल्याचे उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांनी केडगाव येथील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकारी फोडून मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेला राजकीय भूकंप सर्वश्रूत आहे. या भूकंपात कॉंग्रेस पुरती उद्‌ध्वस्त होण्याच्या स्थितीत आली होती. शिवसेनेला मात्र हा भूकंप सहानुभूतीसाठी फायद्याचा ठरला. शिवसेनेने तो राजकीय पटलावर कॅश देखील केला. केडगावमध्ये शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले. या राजकीय भूकंपाचे चांगले, वाईट परिणाम लक्षात घेऊन भाजपने यावेळी सावकाश समीकरणे आखण्याची रणनीती घेतली आहे.

राष्ट्रवादीला बरोबर घेताना प्रदेश नेत्यांचा सहभाग करून घेण्याचे ठरविले आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले व ज्येष्ठ नेते ऍड. अभय आगरकर हे त्यासाठी प्रदेशकडे लक्ष ठेवून आहेत. प्रदेशचा निर्णयावरचा पडदा भाजपकडून उद्या (गुरूवारी) निवडणुकीसाठी अर्ज नेल्यावरून उठेल, असे जाणकार सांगत आहे.


भाजप-राष्ट्रवादीचा भरवसा नाय!

भाजपने महापौरपदाचा अर्ज नेल्यास राष्ट्रवादीला उपमहापौरपद मिळेल. भाजपला युतीचा आदेश आल्यावर काही गडबड होऊ, नये म्हणून राष्ट्रवादीने “बी प्लॅन’ तयार केला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी महापौरपदासाठी देखील उमेदवार देणार आहे. तसा अर्ज देखील नेणार आहे, अशी माहिती पक्षांमधील सूत्रांनी दिली आहे.


बसपचा व्हीप, वाकळेंना मतदान करा
भारतीय जनता पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवारासाठी बहुजन समाज पक्षाचे गटनेता मुदस्सर शेख यांनी नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. भाजपने उमेदवारीचा अर्ज नेण्याअगोदरच हा व्हीप बजावल्या गेल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हीपला कायद्याच्या चौकटीत काही अर्थ आहे का, याची तपासणी केली जात आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)