मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागारपदी हरजितसिंह वाधवा

नगर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार सदस्यपदी हरजितसिंह वधवा यांची पुन्हा सन. 2018 – 19पर्यंत च्यानिवडीचे पत्र नुकतेच वरिष्ठ वाणिज्य अधिकारी आणि सोलापूर रेल्वेचे विभागीय सचिव आर. के. शर्मा यांनी वधवा यांना दिले आहे.
या पूर्वी विभागीय सदस्य असताना आणि अहमदनगर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून वधवा यांनी सोलापूर विभागात असलेल्या अहमदनगर रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण, दौंड येथे कोड लाईन, अहमदनगर स्थानकाच्या दुसऱ्याफलाटावर आणि मोठी शेड करिता यशस्वी पाठपुरावा केला, दौंड ते मनमाड रेल्वे लाईन चे विदुतीकरण, एक्‍सप्रेस रेल्वे गाड्यांना नगर स्थानाकावर थांबा, साई पॅसेंजरला अतिरिक्त डबे, पासेंजर करीता स्थानकावर अतिरिक्त सुविधा, रेल्वे वेळापत्रक, तसेच नगर पुणे रेल्वे चा प्रवास व्हावा या करिता पाठपुरावा असे अनेक उपक्रम आणि पाठपुरावा करण्यात आले होते. तसेच अहमदनगरच्या रेल्वे स्थानकावर कॅमेरे बसविण्यासाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केलेला आहे.
रेल्वे ला लागणाऱ्या सुट्याभागांची माहिती उद्योजकांना उपलब्ध व्हावी यासाठी प्रदर्शन आयोजन करण्याचा प्रयत्न केले, पुन्हा त्याचा पाठ पुरावा करून नगर उद्योजकांसाठी असे प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, नगर पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू व्हावी, तसेच माल धक्‍यावर अधिक सुविधा, कार्गो सर्विसेस करीता एक्‍सप्रेस गाड्यांना अतिरिक्त वेळ थांबा जेणे करून रेल्वे कार्गो सर्विस ला देखील नगर स्थानकावरून चालना मिळेल या करीता पाठपुरावा करणार असल्याचे वधवा यांनी सांगितले.
एम.सी.सी.आय आणि ए या संघटनेचे अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांनी वधवा सदर निवड होण्याकरिता पाठ्‌पुरावा केले. त्यांची निवडीबद्दल सर्वश्री लायन अरविंद पारगावकर, लायन धनंजय भंडारे, प्रशांत मुनोत, जसमीतसिंह वधवा, लकी सेठी, डॉ. अमित बडवे, विपुल शहा, सुनील छाजेड, आदींनी अभिनंदन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)