मध्य प्रदेश येथून मार्केट यार्डात नवीन गव्हाची आवक सुरू

गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन अधिक होण्याची शक्‍यता 


भावात अल्पशी घसरण

पुणे- मार्केट यार्डातील भुसार विभागात मध्य प्रदेश येथून नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. चवीला उत्तम असल्याने पुणेकर या गव्हाची अतुरतेने वाट पाहत असतात. मध्य प्रदेशबरोबरच गुजरात, राजस्थान आणि राज्याच्या विविध भागातून बाजारत गहू येत आहे. पोषक वातावरण, योग्य प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे यंदा गहू उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बाजारात मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्याने गव्हाच्या भावात प्रतिक्विंटलमागे शंभर रुपयांनी घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
खरीप हंगामात चालू वर्षी पावसाने उत्तम साथ दिलेली आहे. तसेच अनुकूल हवामानामुळे त्याचा फायदा रब्बीतील पिकांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या मध्यप्रदेशसह राजस्थान, गुजरात येथून 2496, लोकवन, तुकडी, 496 आदी गहू बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. लवकरच अन्य राज्यांतील गव्हाचाही हंगाम सुरू होणार आहेत. मागील महिन्यात गव्हाच्या प्रतिक्विंटलला 2 हजार 200 ते 2 हजार 500 रुपये भाव मिळत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गव्हाची आवक वाढल्याने भावात 100 रुपयांनी घसरण झाली आहे. परिणामी, मध्यप्रदेशातील लोकवनच्या प्रतिक्विंटलला 2 हजार 75 ते 3 हजार 100 रुपये, तुकडी 2 हजार 150 ते 3 हजार रुपये तर महाराष्ट्रातील लोकवनला 2 हजार 50 रुपये भाव मिळत आहे.
याविषयी गव्हाचे व्यापारी विजय मुथा म्हणाले, सध्या मार्केट यार्डात राज्यातून गव्हाच्या दररोज 10 ते 15 गाड्या, गुजरात येथून 15 ते 20 गाड्या, मध्य प्रदेश येथून 30 ते 40 ट्रक बाजारात दाखल होत आहे. सध्या गव्हाची आवक वाढली असली, तरीही अपेक्षित एवढी होत नाही. एप्रिलपासून नियमित आवक सुरू होईल. सध्या बाजारात गव्हाला मागणीही कमी असून 10 एप्रिलनंतर त्यामध्ये वाढ होईल. दरम्यान, राजस्थान येथून होणाऱ्या सिहोर गव्हाची आवक अद्याप सुरू झाली नसून ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. यंदा देशभरातील गहू उत्पादक राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन चांगले झाले असून दर्जाही चांगला आहे. मध्यप्रदेश सरकारने तर गव्हाच्या प्रतिक्विंटलमागे 265 रुपये शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)