मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यावर दगडफेक प्रकरणी 35 जणांना अटक

सीधी (मध्य प्रदेश) – मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावरील दगडफेक प्रकरणी पोलीसांनी 35 जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या जन आशीर्वाद यात्रेत काळे झेंडे दाखवण्याचे काम हे युवक करत होते. या सर्वांवर गैरजमानती नियमांखालील आरोप ठेवण्यात आले आहेत.

आरोप सिद्ध झाल्यास त्यांना 3 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. 35 पैकी 24 जणांना चुरहट मध्ये, 3 जणांना सीधीमध्ये आणि कमर्जी ठाणा हद्दीत 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे.

गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी आरोपींना 24 तासांत अटक करण्याचे आदेश दिले आहेत, या प्रकरणी कोणाला सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)