मध्य प्रदेश आयपीएस अधिकाऱ्याला सक्तीची मुदतपूर्व निवृत्ती

नवी दिल्ली – एका आयपीएस अधिकऱ्याला केंद्र सरकारने सक्तीची निवृत्ती दिली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या शिफारशींवरून मयांक जैन या आयपीएस अधिकाऱ्याला निवृत्त करण्याचे आदेश 13 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे दिले आहेत. ज्याचा 20 वर्षे सेवाकाल पूर्ण झाला आहे, किंवा ज्यांनी वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे, अशा अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याच्या पद्धतीनुसार मयांक जैन हे यापुढे सेवा चालू ठेवण्यास अयोग्य आढळल्यामुळे त्यांना निवृत्ती देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

1995 च्या बॅचचे आयपीसएस अधिकारी मयांक जैन हे एक डॉक्‍टरही आहेत. चार वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भोपाळ, उज्जैन, इंदूर आणि रेवा येथील मालमत्तेवर लोकायुक्त पोलीस टीमने धाड घातली होती. या धाडीत कोट्यवधीची बेहिशिबी मालमत्ता आढळली होती. त्या प्रकरणावरील कारवाई चालू असून त्याचा या सक्तीच्या निवृत्तीशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

धाड घालण्यात आली तेव्हा मयांक जैन भोपाळमध्ये आयजी (कम्युनिटी पोलीसिंग) पदावर होते आणि त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आलेल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)