मध्य प्रदेशात वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात; चार ठार

छत्रपूर – मध्य प्रदेशात छत्रपूर-सागर रस्त्यावर अंगोर गावाजवळ वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला झालेल्या अपघातात चार जण ठार झाले तर अन्य बारा जण जखमी झाले आहेत. या वाहनाला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंगोर येथील विवाह समारंभ उरकून वऱ्हाडी मंडळी बमनी घाट या आपल्या मूळ गावी परतत असताना हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. वऱ्हाडी मंडळींचे हे वाहन मिनी व्हॅनच्या स्वरूपातील होते. ट्रकचालक भरधाव होता. त्याचे ट्रक वर नियंत्रण न राहिल्याने तो सरळ वऱ्हाडाच्या वाहनावर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. आसपासच्या नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)