मध्य प्रदेशात छोटे छोटे पक्ष बनणार कॉंग्रेस व भाजपासाठी संकट

भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील निवडणुकीत या वेळी छोटे छोटे पक्ष कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही मोठ्या पक्षांसाठी संकट बनणार असल्याचा रंग दिसत आहे. ऍट्रॉसिटी कायदा, पदोन्नतीसाठी आरक्षण आणि मागास वर्गीय आदी कारणांमुळे निवडणुकीतील पारंपरिक समीकरणे बिघडून गेली आहेत. आणि कोणतीहे लाट नसलेल्या या निवडणुकीत छोट्या छोट्या पक्षांची उपस्थिती आणि त्यांनी मते खाण्यामुळे जिंकणारी बाजीही पलटण्याच्या शक्‍यता वाढल्या आहेत. कारण हार-जितीतील अंतर कमी होत चालले आहे.
सध्याच्या घटनाक्रमामुळे सवर्ण आणि आरक्षित वर्गातील राजकीय द्वेष आणि मतभिन्नता पराकोटीची वाढली आहे, दुसरी गोष्ट म्हणजे कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही मोठ्या पक्षांच्या राजनैतिक आस्थांबाबत प्रश्‍नचिन्हे उभी राहत आहेत.
सन 2013 च्या निवडणुकीत प्रगत आणि मागास, दोन्ही वर्गांची मतांत भाजपाने आघाडी घेतली होती. राज्यात कॉंग्रेसच्या (36.38 टक्के) तुलनेत भाजपाला (44.87) टक्के 8.57 टक्के मते जास्त मिळाली होती, तर अपक्ष आणि छोट्या छोट्या पक्षांमध्ये 14 टक्के मते विभागली गेली होती.
गेल्या वर्षभरात राजकीय वातावरणात मोठे बदल घडून येत आहेत. मध्य प्रदेशात अनुसूचीत जाती आणि अनुसूचित जमातींसाठी 82 जागा राखीव आहेत. यातील आणि सवर्ण जातींतीलही बहुतेक जागा भाजपाच्या वाट्याला गेल्या होत्या. गेल्या वेळी यातील 60 जागा भाजपाला मिळाल्या होत्या.
आता संतुलन बिघडले, तर या वर्गांचा जनाधार निसटू शकेल. 37.57 लाख नवीन युवा मतदारांचा कल निर्णायक ठरू शकणार आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी सर्वांचाच प्रयत्न राहील. आणि वाढती महागाई हा तर एक चिंतेचाच मुद्दा आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)