मध्य प्रदेशात अविवाहित महिलांसाठी पेन्शन

भोपाळ (मध्य प्रदेश) – मध्य प्रदेशात मुख्यमंत्री अविवाहित महिला पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी या योजनेला मंजुरी देण्यात आली.
मध्य प्रदेशाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या या मुख्यमंत्री अविवाहित महिला पेन्शन योजनेचा लाभ 50 वर्षांवरील अविवाहित महिलांना मिळणार आहे.

या पेन्शन योजनेअंतर्गर्त 50 ते 79 वर्षे वयोगटातील अविवाहित महिलांना दरमहा 300 रुपये आणि 80 वर्षांवरील अविवाहित महिलांना दरमहा 500 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. अगोदर या योजनेचे नाव अपरिणिता पेन्शन योजना ठेवण्यात आले होते. परंतु त्याला स्वत: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीच हरकत घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्या नावाचा अर्थ मलाच कळत नाही, तेथे ज्यांच्यासाठी ही योजना आहे, त्यांना कसा कळणार आहे? असे म्हणून त्यांनी नाव बदलायला लावले. आता या योजनेचे नाव मुख्यमंत्री अविवाहित महिला पेन्शन योजना ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)