मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात, 7 विद्यार्थ्यांसह चालकाचा मृत्यू 

सतना – सतना जिल्ह्यातील बीरसिंहपूर गावाजवळ आज भीषण अपघात घडला. स्कूल बस आणि खासगी बसची समोरासमोर धडक होऊन यात 7 विद्यार्थी आणि व्हॅन चालकाचा मृत्यू, तर 8 जण जखमी झाले आहेत.
ही घटना आज (गुरुवार) सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.

मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यापासून सुमारे 40 किमी अंतरावर बीरसिंहपूर गावाजवळ हा अपघात झाला. पोलीस अधिक्षक संतोषसिंह गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरसिंहपूर येथे झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 8 ते 9 जण जखमी झाले आहेत. हा अपघात सुमारे 10.30 च्या सुमारास झाला.

-Ads-

सर्व विद्यार्थी हे बीरसिंहपूर येथील लकी कॉन्वेंट स्कूलचे होते. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल जैन, पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्‌विटरवर त्यांनी मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली असून पीडितांच्या कुटुंबीयांना त्वरीत मदतीचे आदेशही दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)