मध्य प्रदेशचे भविष्य सुरक्षित नाही: ज्योतिरादित्य सिंधिया 

भोपाळ : काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंदसौर अत्याचार प्रकरणी मध्य प्रदेश सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्या राज्यात महिला सुरक्षित नसतात, त्या राज्यात सरकारच अस्तित्वात नसते, अशा शब्दात सिंधिया यांनी शिवराजसिंग चौहान सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मंदसौर अत्याचार प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यासही विलंब लावण्यात आल्याचे सांगत चौकशीतही विलंब लावण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणी त्यांनी मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही आपल्या टीकेचे लक्ष्य केले. मंदसौर अत्याचारानंतर पीडित ८ वर्षीय चिमुरडीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा तिला पाहायला आलेल्या भाजप खासदाराला धन्यवाद द्या असे भाजप नेते म्हणत होते, असे म्हणत भाजपचे नेते सतत बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत, हीच भाजप नेत्यांची संवेदनशीलता आहे, अशा शब्दांत सिंधिया यांनी भाजप नेत्यांवरही टीकास्त्र सोडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा राज्यातील ५० टक्के लोकसंख्येचा मुद्दा आहे आणि तो राज्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न बनल्याचेही ते म्हणाले. महिलांना न्याय मिळाला पाहिजे मात्र तो मिळत नाही. राज्यात सर्वत्र महिला गार्डसची नियुक्ती केली पाहिजे, सतत पेट्रोलिंग व्हायला पाहिजे, अत्याचार करणारे असे कृत्य करण्यास भविष्यात धजावणार नाहीत इतकी कठोर कारवाई केली गेली पाहिजे असे सिंधिया म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)