मध्यस्थावरच चाकूने वार

पिंपरी – वाद सोडवण्यास गेलेल्या मध्यस्थावरच चाकूने वार कऱण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री सहाच्या सुमारास पुनवळे येथे घडली.

याप्रकरणी बाबुराव बाळू भुजबळ (वय-44, रा. मालवाढी, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात जुबैर उर्फ मुन्ना मौला (वय-28, रा. पुनावळे) याच्याविरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना व त्यांच्या मित्र इकबाल यांच्यात आपापसात भांडण सुरु होते. ही भांडणे सोडवण्यासाठी बाबूराव हे तेथे गेले असता मुन्ना याने बाबुराव यांच्या डाव्या हाताच्या पंज्यावर चाकूने वार केले. तर याच प्रकरणात मुन्ना यानेही शुभम भुजबळ (वय-21, रा. पुनावळे) याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मारहाणीचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)