मध्यरात्री फटाके फोडणे पडले महागात; दोघांना अटक 

मुंबई: पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि प्रदुषणाला आळा बसावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी काही निर्बध लागू केले आहेत. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन होताना दिसत नाहीत. मुंबईतील मानखुर्द येथे दिवाळीनिमित्त मध्यरात्री मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाऱ्या दोन जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्रनगरमध्ये राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी 7 तारखेला मध्यरात्री फटाके फोडणाऱ्या 2 जणांवर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

वेळेची मर्यादा न पाळता मोठे आवाजाचे फटाके फोडणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ बनवून त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. या दोघांवर कलम 188 , 34 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 यू अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी या व्हिडीओच्या मदतीने 8 तारखेला श्‍याम धीरु खालीदिया आणि सुनील रमेश पगारे या दोघांना अटक केली. दोघांची नंतर जामिनावर मुक्तताही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)