मध्यम स्वरुपाच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग२)

मध्यम स्वरुपाच्या पावसात पिकांची घ्यावयाची काळजी (भाग१)

* पशुधन व्यवस्थापन – पावसाळ्यात जनावरांच्या खुरांची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. विशेषत: संकरीत गायी व पांढरी खुरे असणारे सर्व जनावरांची खुरे भिजून मऊ होतात. त्यात खडे/ काटे टोचून जखमा होतात. खुरात चिखल रुतुन बसतो. अशावेळी खुरांचे निरीक्षण करुन उपचार करावा. विशेषत: शेळ्या मेंढ्या यांच्यामध्ये खुरकुन दिसून येते. त्यासाठी वाढलेली व कुजलेली खुरे काढून टाकावी. खुरे झिंक सल्फेटच्या 10 टक्के द्रावणात 15 मिीाटे बुडवून ठेवा. मोरचुदाचे द्रावणही चालू शकते. पशुवैद्यकाच्या सहाय्याने औषधोपचार करा. हवेतील आर्द्रता वाढली असल्याने जनावरांना सर्दी, फुफुसाचा दाह यांचा त्रास होण्याची संभावना असते. शक्‍यतो गोठे कोरडे ठेवा. गोठ्यात वाढलेले गवत, रिकामी पोती यांची बिछायत टाका. चुना भुरभुरा.

गोठ्यातील वातावरण ऊबदार ठेवा. यासाठी गोठ्यात धुरी करा. जनावरांचा साठलेला चारा उदा. कडबा, मुरघास तसेच खाद्य विशेषत: शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, गोळीपेंड यावर हिरवट काळसर बुरशी आली असेल तर असे खाद्य जनावरानां देऊ नका. चारा व खाद्य पावसात भिजणार नाही अशा ठिकाणी साठवा. शक्‍य नसेल तर पॉलिथीन पेपरचा वापर करा. जनावरांच्या आहारात वाळलेल्या चाऱ्याचे प्रमाण वाढवा म्हणजे शेणाची पोहरी व्यवस्थित बांधनूा राहील. माशा व डास यांचा प्रादुर्भाव टाळा.

वांगीफळे लागणे-या पिकावर शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास किडग्रस्त शेंडे दर आठवड्याने खुडून टाकावित आणि नष्ट करण्यात यावे. फळे तोडणीनंतर किडग्रस्त फळे गोळा करुन ती जमिनीत पुरावीत.
* फळपिके – पुढील 24 तासामध्ये जोरदार वाऱ्याची शक्‍यता लक्षात घेता फळबागानां व फळपिकानां काठी किंवा बांबूचा आधार द्यावा.
पावसाळ्यात फवारणी करतानां स्टिकरचा वापर करावा.

मफुकावी, राहुरी तथा प्रमुख अन्वेषक ,ग्राकमौसे, राहुरी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)