मध्यप्रदेश, बिहारमध्ये दोन पत्रकारांचे अपघाती निधन

कुटूंबीयांकडून हत्येचा संशय
भिंड – मध्यप्रदेश आणि बिहारमधील दोन स्वतंत्र घटनांमध्ये आज दोन पत्रकारांचे अपघाती निधन झाले. दोघांच्याही कुटूंबीयांनी त्यांच्या हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणांचे गूढ वाढले आहे.

मध्यप्रदेशातील भिंडमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संदीप शर्मा (वय 35) यांचे अपघाती निधन झाले. रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असणाऱ्या शर्मा यांना एका ट्रकने उडवले. भिंडमधील पोलीस ठाण्यासमोरच हा अपघात झाला. बेकायदा वाळू उपशाविषयी शर्मा यांनी एक स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर वाळू माफियांकडून जीविताला धोका असल्याची तक्रारही त्यांनी दिली होती. दरम्यान, बिहारच्या अरामध्ये एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे पत्रकार नवीन निश्‍चल आणि त्यांचे मित्र असे दोघे मृत्युमुखी पडले.

या अपघातामागे गावाचा माजी प्रमुख असल्याचा आरोप निश्‍चल यांच्या कुटूंबीयांनी केला. निश्‍चल एका हिंदी दैनिकात काम करत होते. त्यांच्या दुचाकीला धडक देणारे वाहन अडवून संतप्त ग्रामस्थांनी पेटवून दिले. मात्र, ग्रामस्थांनी रोखण्यापूर्वी त्या वाहनात असणाऱ्यांनी अपघातस्थळावरून पलायन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)