मध्यप्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कमलनाथ

ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे प्रचाराची धुरा
नवी दिल्ली – मध्यप्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आज ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची नियुक्ती करण्यात आली. तर प्रचार समितीचे अध्यक्ष या नात्याने त्या राज्यातील पक्षाच्या प्रचाराची धुरा तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान, शांताराम नाईक यांच्या जागी गिरीश चोडांकर यांना गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने काही महत्वाचे फेरबदल केले आहेत. मध्यप्रदेशात चालू वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने तेथील खांदेपालटाला कॉंग्रेसच्या दृष्टीने आणखीच महत्व प्राप्त झाले आहे. नाथ यांच्या मदतीला पक्ष संघटनेची धुरा सांभाळण्यासाठी चार कार्याध्यक्ष देण्यात आले आहेत. बाला बच्चन, रामनिवास रावत, जितू पटवारी आणि सुरेंद्र चौधरी अशी त्यांची नावे आहेत.

-Ads-

कॉंग्रेसच्या मध्यप्रदेशातील प्रदेश संघटनेला गटबाजीने ग्रासले आहे. त्यामुळे फेरबदलांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींनी विविध गटांमध्ये समतोल साधल्याचे मानले जात आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाथ यांच्याबरोबरच शिंदे हेही होते. त्यामुळे नाथ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आल्यामुळे शिंदे यांनाही खुष करण्यात आल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)