भोपाळ :काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि छिंदवाड्याचे खासदार कमलनाथ यांना मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळाली आहे. तर गुण्याचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अशोक गेहलोत यांच्याकडून याबद्दलचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले.
बाला बच्चन, सुरेंद्र चौधरी, जीतू पटवारी आणि रामनिवास रावत यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले दिग्विजय सिंग आणि विरोधी पक्षनेते अजय सिंग यांना मात्र कोणतीच जबाबदारी देण्यात आली नाही. आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत राहिलेले अरुण यादव यांचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. यादव यांनी स्वतःची जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडल्याचे राहुल यांनी म्हटले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नव्या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याची माहिती गहलोत यांनी दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा