मध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी 

भोपाळ: मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणूकीमध्ये अधिकृत उमेदवार नसताना उमेदवारी अर्ज भरणाऱ्या 53 बंडखोरांची भाजपने हकालपट्टी केली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ज्यांनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत, अशा बंडखोरांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. या बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत म्हणून पक्षाच्यावतीने गेले काही दिवस प्रयत्न केले जात होते. मात्र तरिही निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्यांना पक्षाने अर्धचंद्र दिला आहे.

बंडखोरी केल्यामुळे पक्षातून काढून टाकलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री रामकृष्ण कुसमारिया आणि के.एल.अग्रवाल यांचाही समावेश आहे. याशिवाय तीन माजी आमदार आणि माजी महापौरांनाही पक्षातून डच्च्यऊ देण्यात आला आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर या बंडखोरांशी मोठ्या प्रमाणावर मतभेद उघड झाले होते. विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसपेक्षाही तिकिटवाटपावरून झालेले हे स्थानिक मतभेद अधिक तीव्र होते.
कॉंग्रेसमध्येही 12 जागांवर बंडखोरी झाली आहे. कॉंग्रेसने माजी आमदार झेवियर मदा यांची कालच पक्षातून हकालपट्टी केली आहे. मध्यप्रदेशात 230 जागांसाठीच्या विधानसभेसाठी 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)