भोपाळ: मध्यप्रदेशात भाजपच्या दोन युवा नेत्यांनी एका कार्यक्रमादरम्यान हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात भोपाळमधील बैरागड येथील पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य राहुल रजपूत यांनी हवेत गोळीबार करतानाचा हा व्हिडीओ आहे. तर त्याच ठिकाणी बैरागडमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नितीन दुबेही याच पद्धतीने हवेत गोळीबार करून आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत. रविवारी आपल्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते. कार्यकर्त्यांपैकी एकाने केलेल्या विनंतीवरून चिनी बनावटीच्या बंदुकीतून हवेत फैरी झाडल्या, असे राजपूत यांनी पत्रकारांना सांगितले.

ही बंदुक चिनी बनावटीची होती. आपल्या लायसेन्स असलेल्या पिस्तुलातून आपण फैरी झाडल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे बैरागड पोलिसांनी म्हटले आहे. मात्र फैरी झाडलेली बंदुक लायसेन्स असलेली होती का याचा तपास केला जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)