मध्यप्रदेशात पेट्रोल महागणार

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच असून,इंधनाच्या किंमती स्थिर ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता मध्यप्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी  वाढ करण्यात येणार आहे. हे नवीन दर आज मध्यरात्री पासून लागू होतील.

मध्य प्रदेशात पेट्रोल-डिझेलवर सोमवारपासून अतिरिक्त कर (सेस) लागू होणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एक टक्क्याने वाढ होणार आहे. मध्य प्रदेश सरकारने यासदंर्भात अधिसूचना काढली आहे.मध्य प्रदेश कॅबिनेटने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पेट्रोल-डिझेलवर सेस लावण्याची घोषणा केली होती. या आधी सेस केवळ ५० पैसे प्रति लीटर लावण्याचं बोललं जात होतं. मात्र, आता प्रत्येक लिटरवर सेस १ टक्क्याने वाढवण्यात येणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)