मध्यप्रदेशात पाकिस्तानच्या क्रिकेट विजयाचा जल्लोष करणारे 15 अटकेत

पोलिसांनी दाखल केला देशद्रोहाचा गुन्हा
बुऱ्हाणपुर, दि. 20 – चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानी क्रिकेट संघाने भारताचा पराभव केल्याच्या घटनेनिमीत्त आनंदोत्सव साजरा करणे मध्यप्रदेशातील पंधरा जणांना महागात पडले आहे. पोलिसांनी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे.
मध्यप्रदेशच्या मोहाड शहरात ही घटना घडली. भारताचा पराभव झाल्याने त्याच्या आनंदाप्रित्यर्थ काही समाजकंटकांनी फटाके वाजवल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. या समाजकंटकांच्या गटाने शहरात आरडाओरड करीत एक मिरवणूकही काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांना तेथे हस्तक्षेप करावा लागला. अटक करण्यात आलेले सर्व जण 18 ते 35 वयोगटातील आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका सुभाष लक्ष्मण कोळी नावाच्या एका इसमाचाहीं समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाकीच्यांची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत. या पंधरा जणांचा जामीन स्थनिक न्यायालयाने नाकारल्यानंतर त्यांची रवानगी खांडवा येथील कारागृहात करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)