मध्यप्रदेशात धबधब्यात अडकलेल्या 45 जणांची सुटका

शिवपुरी (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील सुलताअनगढ येथील धबधब्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या 45 पर्यटकांची पहाटेच्या सुमारास सुटका करण्यात आली. त्यापैकी 5 जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली, असे पोलिस अधिक्षक राजेश हिंगावकर यांनी सांगितले. या धबधब्यात उतरलेले 8 पर्यटक अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. तर उर्वरित 45 जण प्रवाहामध्येच अडकून पडले होते. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने या सर्वांना सोडवण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. त्यानंतर या पर्यटकांच्या शोधाची मोहिम सुरू झाली होती. यापैकी सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधाचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.

धबधब्यात अंघोळीला उतरलेल्यांपैकी किमान 10 जण वाहोन गेल्याचे काही साक्षीदारांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे पार्वती नदीला प्रचंड पूर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)