मध्यप्रदेशात दरवर्षी दहा लाख नोकऱ्या देण्याचे भाजपचे आश्‍वासन

भोपाळ: भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेशसाठी निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला असून त्यात त्यांनी दरवर्षी दहा लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याची ग्वाही मतदारांना दिली आहे. भाजपने या जाहींरनाम्याला दृष्ट्रीपत्र असे नाव दिले आहे. पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते या दृष्टीपत्राचे प्रकाशन झाले.

यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षी दहा लाख नोकऱ्यांसह राज्यात मोफत शिक्षण देण्याचीही घोषणा केली. ते म्हणाले की आम्ही राज्याच्या विकासाचा एक विस्तृत रोडमॅप तयार केला आहे तसेच राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत.

या निवडणुकीत भाजपची मुख्य लढत कॉंग्रेस पक्षाशी आहे. या पक्षाने गेल्याच आठवड्यात आपला निवडणूक जाहीर नामा प्रकाशित केला असून त्यात त्यांनीही हिंदुत्वाची कास धरली आहे. राज्यात स्वतंत्र अध्यात्मिक विभाग सुरू केला जाईल, संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिले जाईल तसेच गोरक्षण आणि गोशाळांना प्रोत्साहन दिले जाईल अशी आश्‍वासने कॉंग्रेसनेही या जाहींरनाम्यात दिली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)