इलेक्‍शन ड्युटी टाळण्यासाठी शक्कल?
भोपाळ – निवडणूक आयोगाने घेतलेल्या परीक्षेत मध्यप्रदेशातील तब्बल 58 टक्के अधिकारी अनुत्तीर्ण झाले. मात्र, इलेक्‍शन ड्युटी टाळण्यासाठी अधिकारी मुद्दाम नापास झाल्याचा संशय आयोगाला आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.

मध्यप्रदेशात चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीच्या तयारीशी संबंधित परीक्षा आयोगाकडूून घेण्यात येत आहे. सुमारे 1 हजार अधिकाऱ्यांना ती परीक्षा द्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 18 ऑगस्टला 561 अधिकाऱ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 238 (42 टक्के) अधिकारी उत्तीर्ण झाले. उर्वरित अधिकारी जाणूनबुजून अनुत्तीर्ण झाले असावेत, असे आयोगाला वाटते. त्याबाबत आयोग त्या अधिकाऱ्यांच्या संबंधित विभागांना कळवणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात त्यांना पुन्हा परीक्षेला बसावे लागण्याची चिन्हे आहेत. इलेक्‍शन ड्युटी हे आव्हानात्मक काम मानले जाते. निवडणुकीच्या कामाचा बराच ताण येत असल्याने बरेच अधिकारी आणि कर्मचारी त्याबाबत अनुत्सूक असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)