मध्यप्रदेशसाठी कॉंग्रेसची जम्बो समिती…

नवी दिल्ली – मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या निवडणूक कार्यासाठी पक्षाध्यक्ष राहुूल गांधी यांनी 32 सदस्यांची एक मध्यवर्ती समिती स्थापन केली आहे. त्यात कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजयसिंह, कांतीलाल भूरिया, अजयसिंह, अशोक गेहलोत इत्त्यादींचा समावेश आहे.

या निवडणुकीत कॉंग्रेसला विजयाची आशा आहे त्यामुळे पक्षाने एकजुटीच्या माध्यमातून विजयासाठी प्रयत्न चालवले जात असले तरी पक्षात अनेक गट आहेत. त्यामुळे सर्वांना बरोबर घेण्याचा संदेश देण्यासाठी सर्वच गटांना प्रतिनिधीत्व देण्याची कसरत सध्या पक्षाच्या नेतृत्वाला करावी लागत आहे.

महिला कॉंग्रेस प्रमुख, प्रदेश युवक कॉंग्रेस प्रमुख, एनएसयुआय आणि सेवादल प्रदेश प्रमुखांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर मध्यप्रदेशातील पक्षाच्या एससी, ओबीसी, अल्पसंख्याक, किसान अशा सेलच्या प्रमुखांनाही या जम्बो समितीत सामाऊन घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)