मधुरा जोशी ठरल्या “पुण्याची महाराणी’

शिक्षिका- विद्यार्थिनी एकाच मंचावर
या सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने यमुनानगर-निगडी येथील अमृता विद्यालयातील शिक्षिका वसुधा गोडसे आणि त्यांचीच विद्यार्थिनी राहिलेली निकिता सुंठवाल यांनी एका मंचावर रॅम्पवॉक केला. “सहसा कुठेही अशाप्रकारच्या सर्वसमावेशक स्पर्धा होत नाहीत. या स्पर्धेत आम्ही एकत्र रॅम्पवॉक केला. इतकेच नव्हे तर, फेरीपर्यंतही पोहचलो, त्यातही निकिताला पुण्याची मानिनीचा किताब मिळाला, याचा आनंद वाटत आहे,’ अशा भावना गोडसे यांनी व्यक्त केल्या.

डॉ. पूनम विचारे “पुण्याची स्वामिनी’

निकिता सुंठवाल “पुण्याची मानिनी’

स्नेहल चौगुले “मनमोहक हास्य’च्या मानकरी

पुणे – पारंपारिक वेशभूषा, उखाण्यांची मजा, स्पर्धकांचा आत्मविश्‍वास, प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि विजेतेपदाच्या निकालानंतर झालेला जल्लोष अशा उत्साही वातावरणात “पुण्याची महाराणी’ ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. यावेळी आपल्या सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्‍वासातून परीक्षकांचे मन जिंकत मधुरा जोशी यांनी “पुण्याची महाराणी’ हा किताब मिळविला. तर डॉ. पूनम विचारे (पुण्याची स्वामिनी), निकिता सुंठवाल (पुण्याची मानिनी) स्नेहल चौगुले (मनमोहक हास्य) यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना परीक्षकांतर्फे प्रश्‍न विचारण्यात आले. बुद्धिमत्तेचा कस लागणाऱ्या या फेरीत परीक्षकांतर्फे विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची प्रामाणिक आणि तितकेच ठामपणे उत्तर देत या स्पर्धकांनी त्यांची मने जिंकली. यातूनच अंतिम पुरस्कारासाठी मधुरा जोशी यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदिका रत्ना दहिवलकर यांनी केले.

मी यापूर्वीही सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. मात्र या स्पर्धेच्या वेगळेपणामुळे यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सूक होते. मला पहिल्या दहा विजेत्यांपर्यंत मी नक्की पोहचेन असे वाटत होते. मात्र,स्पर्धेची विजेती होणे, हा अनपेक्षित धक्का होता. परंतु “पुण्याची महाराणी’ हा किताब मिळाल्याचा अतिशय आनंद आहे. या सर्व प्रवासात माझ्या कुटुंबीयांनी मला भरभरून पाठिंबा दिला. यापुढेही विविध सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभाग घेत राहील.
मधुरा जोशी, “पुण्याची महाराणी’ किताबाची मानकरी

“ऋणानुबंध’ आणि “मल्हार फिल्म्स ऍन्ड एन्टरटेनमेंट’ यांच्यातर्फे या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परीक्षक म्हणून विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या श्रुती पाटोळे, स्वीटी गोसावी, जास्मिन जाधव, डॉ. भारती पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी दैनिक “प्रभात’ माध्यम प्रायोजक होते. “नऊवारीचा नखरा’च्या सुचेता कुलकर्णी, “डी. के. ट्रॅव्हल्स’चे देवेश केळकर, “व्यंकटेश ऑटोस्पेअर्स’चे महेश रूद्रावसकर उपस्थित होते. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे गृहिणी, काम करणाऱ्या, अविवाहित अशा सर्व प्रकारच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाची प्राथमिक फेरी पाश्‍चात्य वेशभूषेची होती. यामध्ये 60 स्पर्धकांनी विविध वेषभूषा करून रॅम्पवॉक केला. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या 30 स्पर्धकांची पारंपारिक वेषभूषा या दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली. मराठमोळया संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मुद्रा, हावभाव आणि नऊवारी साडी घालून सौंदर्यवतींनी सादर केलेल्या “रॅम्पवॉक’ने उपस्थितांची मने जिंकली. या वॉकनंतर देण्यात आलेल्या उखाणा “चॅलेंज’ला प्रतिसाद देत, या सर्व स्पर्धकांनी अतिशय चांगले उखाणे सादर केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)