मधुमेह नियंत्रणात ठेवणे शक्‍य – डॉ. बोरावके

लोणी काळभोर – गेल्या काही वर्षांत जगात मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढत असून तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली काळजीपूर्वक पथ्य पाळल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणे शक्‍य आहे, असे प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. कपिल बोरावके यांनी सांगितले.
जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून येथील विश्वराज हॉस्पिटलच्यावतीने परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची मधुमेहाची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना विशेष सवलतीच्या दरातील कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कपिल बोरावके बोलत होते. यावेळी डॉ. डी. एन. हंबीरे, विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड, डॉ. राम, डॉ. आर्या, डॉ. राजेश दाते, डॉ. रुपा शर्मा, डॉ. नामदेव जगताप, डॉ. माधव धर्मे व लोणी काळभोर, थेऊर, फुरसुंगी, पाटस, केडगाव परिसरातील जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मधुमेह कसा टाळावा, आटोक्‍यात कसा ठेवावा, या विषयी डॉक्‍टरांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या 400 सभासदांची मधुमेहाच्या अनुषंगाने रक्त तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपस्थित सर्व सदस्यांना यावेळी सवलतीच्या दरातील कार्डचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)