मधुकर खरेंची पत्रकारिता कौतुकास्पद ः भोसले

पत्रकार मधुकर खरे यांना सन्मान चिन्ह प्रदान करताना सरपंच पुष्पा भोसले,उपसरपंच प्रशांत जाधवराव व इतर मान्यवर.

भुईंजेत गुणवंतांचे सत्कार
सातारा, दि. 11 – मधुकर खरे यांनी निर्भिड पत्रकारितेद्वारे अनेकांना न्याय दिला आहे. त्यांची पत्रकारिता कौतुकास्पद आहे. त्यांचा संपूर्ण भुईंज गावाला अभिमान आहे असे प्रतिपादन भुईंज गावच्या सरपंच पुष्पा भोसले यांनी केले.
संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी कै. बाळशास्त्री जांभेकर आदर्श राज्य पुरस्काराने सन्मानित मधुकर खरे यांचा भुईंज येथील वीर जीवा महाले नाभिक संघटना ,सन्मित्र कला वैभव,आणि जिवा सेना संघटनेच्यांवतिने सत्कार करण्यात
आला. सत्कार भुईंजच्या सरपंच सौ. अर्जुन भोसले यांच्या हस्ते करण्यत आला. याप्रसंगी भुईंजचे उपसरपंच प्रशांत जाधवराव, जिवा सेना संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खरे, नारायण नलवडे, जगन्नाथ दगडे, जीवा महाले संघटनेचे उपाध्यक्ष भगवान खरे, विश्वास खरे, प्रकाश खरे, नारायण खरे, जनार्दन खरे,जगन्नाथ खरे, सत्यवान खरे, शांताराम खरे, शिवाजी पवार, राजेंद्र माने, जितू खरे, वैभव पवार, सुनील खरे,संजय खरे, नाथा खरे, विनायक खरे, सचिन खरे, महेश खरे,गणेश खरे,नंदकुमार खरे,सुरेश खरे,संग्राम खरे,आनंद खरे,सूर्यकांत खरे,धनंजय खरे,विजय खरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
भोसले पुढे म्हणाल्या , मधुकर खरे यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या प्रामाणिक आणि निर्भिड पत्रकारितेची पोचपावती आहे.
प्रशांत जाधवराव म्हणाले, भुईंज मधील एकजूट असलेल्या नाभिक समाजाने राबवलेले विविध उपक्रम ही कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायत नेहमीच त्यांना सहकार्य करेल.
या प्रसंगी मधुकर खरे म्हणाले , ज्या आईने मला घडवले आणि अतिशय संघर्ष करून मला शिकवले त्या माझ्या स्वर्गवासी आईला मी मला मिळालेला पुरस्कार आणि प्रत्येक सन्मान समर्पित करतो.माझ्यावर विश्वास असणाऱ्या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन.
या प्रसंगी नाभिक समाजासाठी झटणाऱ्या जिवा सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खरे यांचा सुध्दा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ऋतुजा खरे या अभिनेत्रिचा ही या प्रसंगी विशेष गौरव करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या सोहम सचिन खरे,भूषण नंदकुमार खरे,सानिका सूर्यकांत खरे यांना ही विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सूत्रसंचालन दत्तात्रय शेवते तर आभार विष्णुपंत खरे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)