मद्यसम्रट विजय मल्यांचे महाराष्ट्रातील 100 कोटींचे फार्म हाऊस ईडीकडून जप्त

नवी दिल्ली, दि. 18- मद्यसम्राट विजय मल्या यांचा महाराष्ट्रातील अलिबाग येथील सागर किनारी असलेला सुमारे 100 कोटी रुपये किमतीचा आलीशान बंगला ईडी (सक्तवसुली संचलनालयाने)ने जप्त केला आहे. मल्यांविरुद्ध चालू असलेल्या अवैध सावकारी तपास प्रकरणात ही कारवाई करणात आलेली आहे. पीएमएलए (प्रीव्हेन्शन लॉंड्रिंग्फ ऍक्‍ट) खाली मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 17 एकरवर पसरलेली ही मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आलेली होती. न्यायासनाकडून मालकाला कोणतीही सूट न देण्यात आल्याने ईडीने चालू वर्षी एप्रिल महिन्यात या मालमत्तेत वास्तव्य करणारांना ती खाली करण्याचे आदेश दिले होते. मल्यांचे नियंत्रण असलेल्या मांडवा फार्म्स प्रा. लि. या कंपनीकडे या मालमत्तेची मालकी होती, असे ईडीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
आज मुंबईहून आलेल्या ईडीच्या विभागीय टीमने या मालमत्तेचा ताबा घेऊन त्यावर तसा आदेश लावला आहे. सदर मालमत्तेची नोंदणीकृत किंमत 25 कोटी रुपये असली, तरी आजच्या बाजारभावाने ती सुमारे 100 कोटीहून अधिक असल्याचे ईडीने म्हटले आहे.
मालमत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया शांतपणे पार पडल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे. आयडीबीआय बॅंकेच्या सुमारे 900 कोटी रुपयांच्या कर्जचुकवेगिरी आणि अवैध सावकारी गुन्हेगारी प्रकरणात ईडी विजय मल्या आणि इतरांचा तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)