मद्यधुंद कार चालकाची पोलिस व्हॅनला धडक

सातारा,दि.12(प्रतिनिधी)
मद्यधुंद कार चालकाने पोलिस व्हॅनला धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. सातारा शहरातील गोडोली नाक्‍याजवळ हा अपघात घडला. यात कारचे व पोलिस व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सातारा पोलिस दलाची व्हॅन क्रमांक एमएच 11 एबी 8250 कोल्हापूरहून साताऱ्याकडे येत होती. पोलिस व्हॅन सातारा शहरातील गोडोली परिसरात असलेल्या महालक्ष्मी मंदीराजवळ आली असता, पाठीमागुन आलेल्या कार क्रमांक एमएच 12 सीएम 333 ही कार चुकीच्या दिशेने पोलिस व्हॅनला ओव्हटेक करून निघाली होती.

दरम्यान कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारची पोलिस व्हॉनला डाव्या बाजूला जोराची धडक बसली. या धडकेत पोलिस व्हॅनच्या पुढील बाजूचे तर कारच्या चालकाकडील बाजूचे नुकसान झाले. दरम्यान घटनास्थळी मोठी बघ्यांची गर्दी जमली होती. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी तात्काळ धाव घेत वाहतूक कोंडी फोडली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)