मदरशांची नावे आणि माहिती हिंदी भाषेतही लिहिण्याचा योगी सरकारचा आदेश

लखनऊ (उत्तर प्रदेश)-उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांची नावे, उघडण्याची-बंद होण्याची वेळ आणि अन्य माहिती फलकावर हिंदी भाषेतही लिहावी असा आदेश योगी सरकारने जारी केला आहे. सर्व लोकांना मदरशाचे नाव, मदरसा उघडण्याची-बंद होण्याची वेळ, तेथे काय शिकवले जाते हे समजावे यासाठी हा आदेश जारी केल्याचे मंत्री बलदेव सिंग ओलाख यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र या आदेशाला मदरशांच्या संचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. अल्पसंख्याकांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अशा प्रकारचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वीही दिले होते. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रगीत गावे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम करावेत. या कार्यक्रमांचे व्हिडियो शूटिंग करावे असा आदेश देण्यात आला होता. त्याला विरोध झाला होता. आता या आदेशाने पुन्हा एकदा विवाद होण्याची शक्‍यता आहे. मात्र अल्पसंख्याकांचा केवळ “व्होट बॅंक’ म्हणून वापर करणाऱ्या विरोधी पक्षांनी त्यांच्या मनात विरोध भरवून दिला असल्याचे बलदेव ओलाख यांनी म्हटले आहे.

मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने बदल करण्यात येणार असून मुलांना इतर विषयही शिकवले जावेत असे बलदेव ओलाख यांनी स्पष्ट केल आहे. या सरकारी आदेशानंतर उर्दू न समजणाऱ्यांना मदरशांची नावे, उघडण्या-बंद होण्याच्या वेळा समजाव्यात म्हणून हिदी भाषेतही लिहिण्याचे तोंडी आदेश देवरिया जिल्ह्याच्या अल्पसंख्याक अधिकाऱ्याने जिल्ह्यातील सर्व मदरशांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)