मदनवाडीतील तणाव चार दिवसांनी निवळला

भिगवण – मदनवाडी गावात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त वर्गणीच्या निमित्ताने गेल्या चार दिवसांपासून झालेले तणावग्रस्त वातावरण भिगवण पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीने निवळले आहे. एकच यात्रा कमिटी होवून त्या माध्यमातूनच यात्रा साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यामुळे तिढा सुटला आहे.
दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्वांना विश्‍वासात न घेता यात्रा उत्सवामध्ये ठराविक गटच यात्रा साजरा करून सरपंच व पदाधिकाऱ्यांना मानपान न देत नसल्याच्या कारणावरून मदनवाडीमध्ये दुसरी यात्रा कमिटी स्थापन करण्यात आली. या दुसऱ्या गटाने वर्गणी सुरू केली होती त्यातच मदनवाडी चौकातच शेजारीशेजारीच दोन्ही गटांनी मंडप, स्टेज टाकल्याने तीन-चार दिवसांपासून वातावरण तणावग्रस्त झाले होते. तर सर्वसामान्यांनी आपण वर्गणी कोणाला द्यायची हा प्रश्‍न उपस्थित केला होता, त्या पार्श्‍वभूमीवर भिगवण पोलीस ठाण्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड यांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बोलावून म्हणणे ऐकून घेतले यावेळी सर्व गोष्टींवर तोडगा काढण्यात आला.

दरवर्षी यात्रेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या वर्गणीतून इतर मनोरंजनाबरोबरच नामवंत मल्लांच्या कुस्त्याचा आखाडा भरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच देवस्थान ट्रस्ट स्थापन करून त्यामाध्यमातून कामे करण्यात यावीत तसेच सरपंच यांच्यासह सर्व घटकातील नागरिकांना कमिटीमध्ये स्थान देण्याची मागणी कुंडलिक बंडगर यांनी केली, तर कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक रंगनाथ देवकाते यांनीदेखील आपण अनेक वर्षांपासून लोकोपयोगी कामे केली असल्याचे सांगितले तर सर्वानुमते एकाच छताखाली येवून यात्रा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सरपंच तुकाराम बंडगर, तेजस देवकाते, विष्णुपंत देवकाते, धनाजी थोरात, नामदेव बंडगर, संजय देवकाते, राजेंद्र देवकाते, बाळासाहेब बंडगर, अण्णा देवकाते आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)