मदनवाडीतील ढवळेवस्तीत घरफोडी

पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

डिकसळ- मदनवाडी येथील भिगवण-बारामती रस्त्यावरील ढवळे वस्तीवरील चोरट्यांनी दरवाजाच्या आतील कडीचा कोयंडा काढून घरफोडी करुन दोन लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 75 हजार रुपयांचा असा एकूण दोन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 5) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तर भिगवण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र दशरथ ढवळे (रा. मदनवाडी ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलिसांत तक्रार दिली आहे. याबबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र ढवळे आपल्या कुटुंबासह रविवारी नेहमीप्रमाणे झोपी गेले. त्यानंतर सकाळी साडेपाचसुमारास ते उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पत्नी नंदा व मुलगा राहुल यास उठवून हा प्रकार सांगितला. त्यांनी घराची पाहणी केली असता ऍल्युमिनियमच्या डब्यात ठेवलले दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे सुटकेसमध्ये ठेवलेले 75 हजारांची रोख रक्कमही आढळून आले नाहीत यावेळी पाहणी केली असता चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सोन्याचे दागिन्यांमध्ये 4 तोळा वजानाचे सोन्याचे गंठण, दोन तोळ्याचे नेकलेस, अर्धा तोळा वजनाचे कर्णफुले, चांदीचे दोन पैंजण असा दोन लाख 10 हजार रुपयांचा ऐवज तसेच सुटकेसमधील 75 हजार रोख रक्कम असा 2 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. दरम्यान, घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास सहायक निरीक्षक नीळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल सातपुते करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)