मदनदादा तुसी ग्रेट हो..!

“किसन वीर’चे उपक्रम पाहुन पंजाबच्या पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

भुईंज – साखर कारखानदीसमोर असणारी प्रचंड आव्हाने पेलत तीन कारखान्यांचे पूर्ण क्षमतेने होत असणारे गाळप. प्रत्येक दिवशी सुमारे चार ते साडेचार हजार टन ऊसाची तोडणी यंत्रणाद्वारे होणारी तोड, या गोष्टी पाहून पंजाबहुन आलेले विविध साखर कारखान्याचे पदाधिकारी मंडळ भारावून गेले. सर्व उपक्रम पाहिल्यानंतर ज्या अडचणीतून ही सारी वाटचाल सुरू आहे तसेच किसन वीर उद्योग समुहाने उभारलेले विविध प्रकल्प पाहुन मदनदादा तुसी ग्रेट हो, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मांजरी बु।। येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे ऊस उत्पादन वाढ प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पंजाब येथील विविध साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ आले होते. यावेळी त्यांनी किसन वीर कारखान्यास भेट दिली. अनुराजदिप सिंग, प्रितीराज, दलवीर सिंग, हर्देर सिंग, रंजोध सिंग, नचतोर सिंग, तेजबीर सिंग, जी. सी. यादव व व्हीएसआयचे ऊस शेती तज्ञ श्री. पवार यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. जगदीश सिंग म्हणाले, ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे किसन वीर कार्यक्षेत्रातील ऊस शेती फायदेशीर ठरली आहे. ऊसतोड मजूरांच्या प्रश्‍नावर मात करीत यांत्रिकीरणाच्या माध्यमातून ऊसतोड करून यशस्वीपणे वाटचाल केली आहे.

किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली ऊस उत्पादन वाढीसाठी विविध योजनांचा तसेच ऊसतोडीसाठी यांत्रिकीरणाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या श्रम आणि वेळेत मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचा निश्‍चितच फायदा होत आहे. “किसन वीर’च्या दिशादर्शक प्रकल्पांचा पॅटर्न पंजाबमधील ऊसशेतीमध्ये राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)