मथुरेत 11 बांगलादेशी नागरीकांना अटक

मथुरा – मथुरेजवळील एका खेड्यात 11 बांगलादेशी नागरीकांना अटक करण्यात आली आहे त्यात पाच लहानमुलांचा समावेश आहे. हे नागरीक तेथे गेल्या दोन वर्षांपासून राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेतले.

मथुरेजवळील जातोरा गावात हे नागरीक राहात होते. त्यात तीन पुरूष, पाच महिला आणि पाच मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडे बोगस आधार कार्ड आणि रेशन कार्डेही सापडले आहेत. मथुरा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना असे बांगला घुसखोर तेथे कोणी राहात असतील तर त्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही वेळा बांगलादेशातील इस्लामिक कट्टरपंथीयांच्या दहशतवादामुळे अनेक हिंदु कुटुंबेही भारतीय हद्दीत आश्रयाला येत असतात. त्यांच्यावरही अशी कारवाई होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)