मथुरेतील समन्वय बैठकीसाठी संघाकडून भाजपलाही निमंत्रण

नवी दिल्ली -उत्तरप्रदेशच्या मथुरामध्ये 1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीन दिवसीय वार्षिक समन्वय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी भाजपसह संघाशी संलग्न असणाऱ्या 40 संघटनांच्या नेतृत्वाला निमंत्रण देण्यात आले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत, संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपने उत्तरप्रदेशची सत्ता काबीज केल्यानंतर त्या राज्यात होणारी संघाची ही पहिलीच महत्वाची बैठक आहे. भाजप आणि इतर संघटनांच्या कार्याचा आढावा बैठकीत घेतला जाईल.

डाव्यांची सत्ता असणाऱ्या केरळमध्ये होणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या हत्या, डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीमशी संबंधित न्यायालयीन निकालानंतर हरियाणात झालेला हिंसाचार आदी मुद्‌द्‌यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. मथुरेत होणारी बैठक नियमित स्वरूपाची आहे. संघ परिवारातील सर्व घटकांनी केलेल्या कार्याच्या तपशीलाची देवाणघेवाण करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणजे ही बैठक आहे, असे यासंदर्भात बोलताना संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)