मत्स्य शेतीतून ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी

संग्रहित छायाचित्र

भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्ह्यात 140 मत्स्यमित्र तयार करणार

नगर – राज्यात नैसर्गिक तलाव, तळी, पाझर तलाव, शेततळी, पाटबंधारे तलाव यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. शेततळ्यात साचवलेल्या पाण्याचा उपयोग अडचणीच्या काळात पिकाला पाणी देण्यासाठी केला जातो. परंतु शेतीला जोडधंदा म्हणून शेततळ्यात शास्त्रीय पद्धतीने माससंवर्धन केले, तर मत्स्योत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन मत्स्यशेतीतून ग्रामीण युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी विस्तार उपअभियान आत्माच्या माध्यमातून शेततळ्यातील मत्स्य पालन शेतकरी प्रशिक्षणप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे बोलत होते. यावेळी अशोक आढाव, मत्स्य विभागाचे व्यवसाय अधिकारी शरद कुदळे, माजी उपायुक्त राजेंद्र डांगरे, बापूसाहेब होले, प्रकाश आहेर आदी उपस्थित होते.

बऱ्हाटे पुढे म्हणाले की, बाजारपेठेत ठराविक लोकांची मक्तेदारी आहे. गरजा वाढत आहेत. परंतु शेतीतले उत्पन्न कमी होत चालले आहे. शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. मत्स्यशेती हा शेतीला जोडधंदा आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाकाठी किमान 50 ते 60 हजार उत्पन्न मिळू शकते. या माध्यमातून जिल्ह्यातून 28 कोटींचे उत्पन्न मिळू शकते. प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेती प्रत्येक गावात पोहोचवायची आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्याला बाजारपेठ मिळेल. शासनाने दिशा दिली आहे. निधी दिला आहे. त्या चांगल्या पद्धतीने कशा पुढे न्यायच्या. हे अधिकाऱ्यांचेच काम आहे. आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात 140 मत्स्य मित्र तयार करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रशिक्षणप्रसंगी झालेल्या मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍नमंजुषेच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना प्रश्‍न विचारण्यात आले. अचूक उत्तर देणाऱ्या 10 शेतकऱ्यांची मत्स्य मित्र निवड करून मत्स्य शेतीसाठी लागणारे 21 हजारांचे कीट बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
यावेळी मत्स्य व्यवसाय अधिकारी शरद कुदळे, माजी उपायुक्त राजेंद्र डांगरे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापन बापू होले यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मनोज सोनवणे यांनी केले, तर आभार प्रकाश आहेर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)