मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र पुढील वर्षी एक नंबरवर

भिगवण- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका असून, शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यशेती उत्तम पर्याय आहे. मत्स्य उत्पादनामध्ये तेलंगणा, छत्तीसगढ, गोवा ही राज्ये पुढे असली तरी पुढच्या वर्षी महाराष्ट्र मत्स्य उत्पादनात प्रथम क्रमांकावर येईल. तसेच भिगवण मत्स्यबीज केंद्र हे राज्यातील आदर्श कल्चर व्हावे यासाठी या केंद्रात नवीन तंत्रज्ञान आणू, असे मत मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
भिगवण येथे महिलांनी उभारलेल्या भिगवण मत्स्यबीज उत्पादन केंद्रास जानकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मत्स्य विभागाचे प्रादेशिक उपआयुक्‍त अभय देशपांडे, सहायक आयुक्‍त अविनाश नाखवा, मत्स्य विकास अधिकारी जनक भोसले, शीतल रायते, वैशाली मल्लाव ऋतुजा जगताप, कोमल कदम, मारुतराव वणवे, अशोक वणवे, आबा बंडगर, संपत बंडगर आदी उपशित होते.
जानकर म्हणाले की, राज्याला मत्स्य उत्पादनासाठी 720 किलोमिटरचा किनारा लाभला आहे. त्यासाठी राज्याला सुमारे 150 कोटी मत्स्यबीजाची आवश्‍यकता आहे; परंतु दुर्देवाने राज्याला बाहेरच्या राज्यातून मत्स्यबीज आणावे लागत आहे. आता त्यासाठी राज्यातील डबघाईला आलेली 26 मत्स्यबीज उत्पादन केंद्रे कार्यान्वीत करण्यात येत आहेत. राज्याची मत्स्यबीजाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढच्या वर्षी मत्स्य बोटुकलीबाबत राज्य स्वंयपूर्ण होईत असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
स्थानिक मत्स्यबीज टिकवण्यासाठी बाहेरच्या राज्यातील मत्स्यबीज आणता येणार नाही असा कायदा करु, प्रसंगी गुन्हे दाखल करु असा इशाराही त्यांनी दिला. भिगवणचे मत्स्यबीज केंद्र हिंदी ऐतिहासिक बनले असून राज्यातील तरुण-तरुणींनी याचा आदर्श घेऊन मत्स्य उत्पादनाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. या मत्स्य उत्पादनासाठी राष्ट्रीयकृत बॅकांही पुढे आल्या असून राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, याचाही फायदा घ्यावा. केवळ अनुदानाचा लाभ न घेता रोजगारावर मात करण्यासाठी उद्योजक बना, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी जानकर यांनी मत्स्यबीज केंद्र व त्यातील मत्स्य बीजांची पाहणी करून समाधान व्यक्‍त केले.
मत्स्य उत्पादनातून 89 कोटींचा फायदा
भिगवणचे मत्स्यबीज केंद्र या भागासाठी मुख्य केंद्र बनवू त्यासाठी लागणाच्या प्रशिक्षण व इतर मार्गदर्शनासाठी मत्स्य तज्ज्ञांना मदतीसाठी पाठविण्यात येईल. आतापर्यंत राज्याला मत्स्य उत्पादनातून 89 कोटींचा फायदा मत्स्य विभागाला झाला आहे. हे उत्पन्न वाढीसाठी राज्यातील तरुण तरुणींनी सहभागाची अवश्‍यता आहे, असे मत मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)