मत्स्यसंवर्धनासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधी

मुंबई : राज्यात मत्स्यव्यवसायात अमर्याद संधी असून युवकांनी या क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी. चांदा ते बांदा योजनेंतर्गत कोळंबी, जिताडा तसेच खेकडा संवर्धन (क्रॅब कल्चर) आदी बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

शासन या उद्योगाला चालना देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे, असे सांगून या बैठकीत व्हेनामी कोळंबीच्या बीज उत्पादन केंद्र (हॅचरी), खेकडा हॅचरीज, जिताडा मासा हॅचरीज व संवर्धन, खारे व गोड्या पाण्यातील पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन, मासेमारी जेट्टींचे आधुनिकीकरण आदी बाबींची चर्चा करण्यात आली.

-Ads-

राज्यात मोठ्या प्रमाणात जलक्षेत्र उपलब्ध असून सागरी किनाऱ्यावरील मत्स्यपालनासाठीही उपयुक्त जागा उपलब्ध आहेत. कोळंबी, खेकडा, जिताडा माशांचे पालन तसेच पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी उपलब्ध जागांची तांत्रिकदृष्ट्या पाहणी व व्यवहार्यता तपासून या बाबींसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जानकर यांनी यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)