मत्रेवाडी घाटरस्त्यावर संरक्षक कठडे नसल्याने प्रवास ठरतोय धोकादायक

ढेबेवाडी – ढेबेवाडी, ता. पाटण येथील ढेबेवाडी ते निगडे रस्त्यावरील मत्रेवाडी येथील घाट वाहन चालक व प्रवांशासाठी बनलाय मृत्यू चा सापळा कारण वेडी-वाकडी वळणे, धोकादायक वळणे तसेच या घाटामध्ये धोकादायक वळणावरती सुचना फलक, तसेच संरक्षण कठडे नसल्यामुळे प्रवाशी तसेच वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

वाल्मिक पठारावरील निगडे, वरचे घोटील, मत्रेवाडी ,माईंगडेवाडी, निवी, कसणी, जाधववाडी या गावांशी जोडणाऱ्या मत्रेवाडी घाट एकमेव मार्ग असल्या कारणाने या गावातील लोकांना याच घाटातून प्रवास करावा लागतो. या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ढेबेवाडी येथे यावे लागते तसेच नागरिकांना ढेबेवाडी ही मोठी बाजारपेठ तसेच गरजेच्या वस्तू, दवाखान्यात याच घाटरस्त्याने ये-जा करावी लागते.

काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरच ढेबेवाडी -निगडे एस. टी. ला अपघात झाला होता. मात्र चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे 40 विद्यार्थी व वयोवृद्ध प्रवाशांचा जीव वाचला. मंगळवारी या भागातील आठवडी बाजार ढेबेवाडी या ठिकाणी असल्यामुळे एसटी ला प्रचंड गर्दी असते. या घाटामध्ये ठिकठिकाणी संरक्षण कठडे नसल्याने दररोज विद्यार्थी, नागरिक, वाहनचालक जीव मुठीत धरुन या घाटातून प्रवास करत असतात. तरी संबधित विभागाने याकडे वेळीच लक्ष घालून डोंगर भागातील जनतेचा प्रवास हा सुखाचा व सोयीस्कर झाला पाहिजे. यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)