मत्रेवाडीत शॉर्ट सर्किटने आग लागून लाखोचे नुकसान 

ढेबेवाडी – मत्रेवाडी, ता. पाटण येथे बुधवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास 10 खण चौघईच्या घरास शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह धान्य, कपडे पुर्णपणे जळून खाक झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, मत्रेवाडी येथील भगवान बापू मत्रे, रमेश विठ्ठल मत्रे, लक्ष्मण रामचंद्र मत्रे, सुरेश विठ्ठल मत्रे, लक्ष्मण खाशाबा मत्रे यांचे 10 खण चौघईचे घर आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सर्वजण झोपी गेले. तद्‌नंतर मध्यरात्री 1.30 च्या सुमारास घरातून आगीचे लोट येऊ लागलेले दिसताच सर्वजण घरातून ओरडत बाहेर पडले. त्यांचा आरडाओरडा ऐकून गावातील लोक जमा झाले. त्यांनी आग विझवण्याचा आटोक्‍याने प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने आगीत संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले.

-Ads-

आग आटोक्‍यात आणण्यासाठी गावातील लोकांनी बोअरला मोटर लावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेजारील जनावरांच्या गोठ्यातून जनावरांच्या दोऱ्या कापून जनावरे बाहेर सोडण्यात आली. 10 खण चौघईच्या घराशेजारी इतर घरे ही होती. या घरांना या आगीपासून वाचविण्यासाठी अजित जाधव याने शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. मात्र या कुटुंबांना अद्यापही कोणतीही मदत मिळालेली नाही. सध्या हे पाच जणांचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांना निवाऱ्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)