मतांच्या बेगमीसाठी राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार दिला

  • रामनाम कोविंद यांच्या उमेदवारीवर शिवसेना नाराज
  •  भाजपने हिंदू राष्ट्र ओळख दाखविण्याची संधी गमावली
  • उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीकेची झोड

मुंबई – भारत हा हिंदु राष्ट्र आहे, तीच आपल्या देशाची ओळख आहे. हिंदू राष्ट्र आहे म्हणून आम्ही राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून मोहन भागवत यांचे नाव सुचविले होते. पण दलित मतांवर डोळा ठेवून भाजपने राष्ट्रपती उमेदवार दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ दलित नव्हे तर देशाचे भले करणारा कोणीही उमेदवार दिला असता तर शिवसेने नक्कीच पाठींबा दिला असता, असे सांगतानाच भारताला हिंदू राष्ट्र म्हणून ओळख दाखविण्याची संधी गमावली आहे. दलित मतांसाठी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे केले असेल तर आम्हाला रस नाही. शिवसेनेने कुणाच्या आडून राजकारण केले नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेचा सोमवारी 51 वा वर्धापनदिन दिमाखात साजरा झाला. त्यानिमित्त षण्मुखानंद येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांची मैदानीमुलुख तोफ धडाडली. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टिकेची झोड उठवली. यावेळी एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मोहन भागवतांच्या नावाबद्दल जर कोणाला अडचण होती तर शेतकछयांना न्याय देण्यासाठी स्वामीनाथन यांचे नाव आम्ही सुचविले होते. आम्हाला या दोन्ही नावांमुळे कोणताही राजकीय फायदा होणार नव्हता. मतांचे राजकारण आम्ही कधी करत नाही. मात्र केवळ दलित मतांसाठी जर कोणी दलित उमेदवार देणार असेल तर आम्हाला त्यात रस नाही. केवळ राजकारणासाठी हे आम्हाला मंजूर नाही असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

  • हिंमत असेल तर मध्यावधी घ्या
    शिवसेना मध्यावधी निवडणुकांना घाबरत नाही. जे मध्यावधीची भाषा करतात त्यांनी मध्यावधी निवडणूक घेउन दाखवावीच असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. मित्र म्हणून आम्ही मित्राची संकटेही अंगावर घ्यायला तयार आहोत. मात्र जर कोणी पाठीत खंजीर खुपसणार असेल तर तुमच्या छाताडावर बसून वार केल्याशिवाय राहणार नाही. जर आपण कायम जिंकतच राहू असा कोणाचा भ्रम असेल तर परिस्थिती आता बदलली आहे हे लक्षात ठेवावे असा इशाराही त्यांनी मित्रपक्षाचे नाव न घेता दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)