मतपेढीच्या राजकारणाला भाजपकडून पूर्णविराम-अमित शहा

कोलकता -मतपेढीच्या आणि लांगूलचालनाच्या राजकारणाला भाजपने पूर्णविराम दिला आहे. भाजपने कामगिरी करून दाखवण्याच्या राजकारणावर भर दिला आहे, असे प्रतिपादन आज या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.
पश्‍चिम बंगालच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असणारे शहा येथे एका कार्यक्रमात बोलत होते. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील मागील यूपीएच्या राजवटीत धोरणविषयक पांगळेपणा दिसून आला. मात्र, मोदी सरकारने मागील तीन वर्षांत ठोस निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवली. मोदी सरकारच्या कार्यकाळात भारत जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला आहे. हे आव्हान सोपे नव्हते. जनतेच्या हितासाठी निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारवर कुठलाच विरोधी पक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करू शकलेला नाही. कामगिरी करून दाखवण्याच्या राजकारणावर भाजपचा विश्‍वास आहे. त्यामुळे ठोस कामगिरी करून दाखवणारेच टिकतील, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. यावेळी शहा यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. एकेकाळी पश्‍चिम बंगाल देशातील इतर राज्यांच्या पुढे होते. आता या राज्याला झाले तरी काय, असा सवाल करत त्यांनी राज्यातील तृणमूल कॉंग्रेस सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आल्याचा आरोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)